Sri Krishnadevaraya Biography in Marathi | विजयनगर सम्राट श्री कृष्णदेवराय यांचे जीवनचरित्र आणि इतिहास मराठीत

by जानेवारी 11, 2020

विजयनगर साम्राज्य इतिहासातील सर्वांत वैभवशाली आणि समृद्ध साम्राज्यांपैकी एक होते. त्यामुळे, तुमच्यासारख्या इतिहासप्रेमींनी एकदातरी विजयनगर साम्राज्याबद्धल वाचले असेल. या महान साम्राज्याचे प्रसिद्ध सम्राट कृष्ण देवराय यांच्या शौर्याला आजची नवीन पिढी विसरत चालली आहे. आज मी आपल्याला या महान राजाबद्दल सांगणार आहे.

सम्राट कृष्णदेवरायांची कीर्ती

सम्राट कृष्णदेवराय यांनी इसवी सन १५०९ ते १५२९ मध्ये विजयनगरवर राज्य केले. ते महान तुलूवा राजवंशाचे तिसरे शासक होते. छत्रपती शिवाजी महाराज यांसारख्या अनेक महान भारतीय शासकांनी कृष्णदेवराय यांना आदर्श मानले होते.

त्यांना त्यांच्या जीवनकाळात कन्नड़ राज्य राम रामन (कन्नड साम्राज्याचे देवता), आंध्र भोज (तेलगू साहित्यासाठी भोज) आणि मोरू रायरा गंडा (तीन राजांचा राजा) यांसारखी शीर्षके मिळाली होती.

त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी बीजापूर, गोलकोंडा, बहमनी सल्तनत, ओडिशाचे गजपती सुलतान यांसारख्या बलाढ्य राज्यांना पराभूत केले होते. जेव्हा बाबर उत्तरेमध्ये मुघल शासनाची सुरवात करत होता, त्या काळात सम्राट कृष्णदेवराय हे सर्वांत ताकतवर शासक होते आणि विजयनगर हे भारतातील सर्वांत सर्वांत विस्तृत साम्राज्य होते.

विजयनगरला भेट देणारे परदेश यात्री

डोमिंगो पेस आणि फर्नाओ नुनिज यांसारख्या अनेक परदेशी पोर्तुगीस प्रवाश्यानी विजयनगरला भेट दिली होती. तिम्मारुसु हे कृष्ण देवराय यांच्या दरबारात पंतप्रधान होते. तिम्मारुसु हे कृष्णदेवराय यांना राज्यकारभार पाहण्यास मदत करायचे.

सम्राट कृष्णदेवराय यांचा राजा बनण्यामागील इतिहास

तुलूवा नारसा नायक हे कृष्णदेवराय यांचे पिता होते. तुलूवा नरसा नायक हे सुलुवा नरसिंगदेवराय यांच्या सेनेचे सेनापती होते. राज्याचे विघटन रोखून राज्याला संघटित आणि प्रबळ बनवण्यासाठी एका सक्षम राजाची गरज होती.

त्यामुळे, कृष्णदेवराय विजयनगरला स्वतःच्या अधिकारामध्ये घेतात. तिम्मरुसु हे यामध्ये कृष्णदेवराय यांची मदत करून त्यांचा राज्याभिषेक कृष्णाजन्माष्टमीच्या दिवशी करतात. कृष्णादेवराय तिम्मरुसु यांना स्वतःच्या पिताचा दर्जा देतात आणि त्यांच्या योग्यतेमुळे त्यांना राज्याचा पंतप्रधान घोषित करतात.

सम्राट कृष्णदेवरायांचे व्यक्तीमत्व

सम्राट कृष्णदेवराय राज्यामध्ये येणाऱ्या परदेशी यात्रेकरूंचा खूप सम्मान करायचे. तसेच कायद्याच्या रक्षणाच्या बाबतीत कठोर होते. त्यांना राज्यातील फितूर आणि दिरंगाईची अतोनात चीड यायची.

विजयनगरला भेट देणाऱ्या यात्रेकरूंच्या प्रवासवर्णनांमध्ये कृष्णदेवराय हे एक उत्कृष्ट न्यायप्रिय शाहक तर होतेच बरोबर उत्तम योद्धे होते. प्रत्येक युद्धामध्ये ते स्वतः सर्व सेनेचे नेतृत्व करायचे, अनेक लढाईंमध्ये ते घायाळ असूनही नेतृत्व केल्याचे वर्णन प्रवासवर्णनांमध्ये आढळते.

श्री कृष्णदेवराय यांचा पुतळा

Statue of Sri Krishnadevaraya
Statue of Sri Krishnadevaraya, Image Credits: Srikar Kashyap

सम्राट कृष्णदेवराय यांचे लष्करी यश

कृष्णदेवराय यांना विजयनगरच्या इतिहासात सर्वाधिक लष्करी यश मिळाले. शेवटच्या क्षणाला युद्धाची योजना बदलण्याची रणनीती वापरण्यासाठी ते ओळखले जायचे. या रणनीतीमुळे शत्रूला नवीन रणनीती समजून त्यावर कारवाई करण्यासाठी वेळ मिळतात नसायचा. अशा युद्धनीतीमुळे ते त्यांच्या कारकिर्दीमध्ये एकही युद्ध हरले नव्हते.

श्री कृष्णदेवरायांचा डेक्कनमधील पराक्रम

डेक्कनचा सुलतान त्याच्या फौजा विजयनगरमधील लोकांची लूटमार करण्यासाठी पाठवत असे. त्यामुळे विजयनगरच्या सीमेलगतची गावे त्रस्त होती. सम्राट कृष्णदेवरायच्या काळात ही लूटमार पूर्णपणे थांबली होती.

सम्राट श्री कृष्णदेवरायांनी इसवी सन १५०९ मध्ये विजापूरवर स्वारी करून सुलतान महमूदशाहला परास्त केले. त्यामुळे, एकेकाळी विजयनगरचे भाग असलेले बिदर, गुलबर्गा, विजापूर हे पुन्हा विजयनगरला जोडले गेले.

सम्राट कृष्णदेवराय महमूदशाहला पुन्हा विजापूरच्या गादीवर बसवल्याने त्यांना “यवन साम्राज्याचे संस्थापक” असा किताब मिळाला. प्रधानमंत्री तिम्मारुसु यांनी गोवळकोंड्याचे सुलतान कुली कुतुबशाहला पराभूत केले.

श्री कृष्णदेवरायांकडून विद्रोही शासकांचा बिमोड

कृष्णदेवराय यांनी उम्मातूरचा प्रमुख धरणीकोटा कामास यांसारख्या अनेक बंडखोर स्थानिक शासकांचा पराभव केला होता. कृष्णदेवराय यांनी इसवी सन १५१६-१५१७ मध्ये गोदावरी नदी पार केली होती.

उदयगिरीचा घेरा आणि विजय

कृष्णदेवरायांच्या काळामध्ये कलिंग म्हणजे ओडिशा आणि आंध्रप्रदेशमध्ये गजपती प्रतापरुद्राचे अधिपत्य होते. उम्मातूरच्या मोहिमेत त्यांना आधार प्रदेशवर आक्रमण करण्यासाठी खूप मदत मिळाली होती.

कृष्णदेवरायांनी आंध्रप्रदेशमधील सध्याच्या नेल्लोर जिल्ह्यातील उदयगिरी किल्ल्याला सुमारे १८ महिने वेढा दिला. किल्ल्यामध्ये जाणारी रसद कापल्याने शेवटी उपासमारीमुळे गजपती प्रतापरुद्राच्या सैन्याला माघार घ्यावी लागते. उदयगिरीच्या यशानंतर सम्राट कृष्णदेवराय तिरुपतीच्या मंदिरात सहपत्नी पूजा करतात.

श्री कृष्णदेवरायांचे कोंडविडू येथील युद्ध

कलिंगनरेश प्रतापरुद्र आणि कृष्णदेवराय यांची सेनेचे कोंडाविदू येथे भयंकर युद्ध होते. कोंडाविदू किल्ल्याला वेढा दिल्यानंतर मोट्या प्रमाणावर होणाऱ्या दुर्घटना व नुकसान टाळण्यासाठी विजयनगरच्या सेनेला काही काळ माघार घावी लागते.

प्रधान तिम्मारुसु कोंडाविदू किल्ल्याच्या पूर्वीय दरवाजापर्यंत जाण्याचा गुप्त मार्ग शोधून काढतात. विजयनगरचे सैन्य पहाटेच्या वेळी अचानक आक्रमण करून किल्ला ताब्यात घेतात. किल्ल्यातील गजपती प्रतापरुद्राचा पुत्र युवराज वीरभद्रला कैद केले जाते.

कोंडविडूचा किल्ला

Kondaveedu Killa
Kondaveedu Fort won by Sri Krishnadevaraya, Image Credits: Abdaal

कलिंगवर विजय

गजपती प्रतापरुद्र याच्या गुप्तचरांना श्री कृष्णदेवराय यांच्या कलिंगवर आक्रमण करण्याची योजना कळाली. त्याप्रमाणे, सम्राट प्रतापरुद्र स्वतःची योजना बनवतो. प्रतापरुद्रच्या पूर्वी सेवेमध्ये असणाऱ्या काही भटक्या तेलगू व्यक्तींनी गजपती प्रतापरुद्रबरोबर विश्वासघात केला.

त्यांना धनलालसा देऊन तिम्मारुसु हे प्रतापरुद्राच्या योजनेची पूर्ण माहिती काढून घेतात. विजयनगरची सेना जेव्हा कलिंगवर आक्रमण करते, तेव्हा प्रतापरुद्र हा कटकला पलायन करतो.

कटक ही त्यावेळी गजपती प्रतापरुद्राच्या साम्राज्याची राजधानी होती. त्यानंतर, लवकरच गजपती प्रतापरुद्र शरणागती पत्करून त्याची मुलगी जगन्मोहिनीचा विवाह सम्राट कृष्णदेवरायाशी करून देतो. श्री कृष्णदेवराय गजपती प्रतापरुद्राचा संधिप्रस्ताव मान्य करतात, त्यामुळे कृष्णा नदी गजपती आणि विजयनगरची सीमा ठरते.

रायचूरची लढाई

रायचूरचा किल्ला

Raichur Killa
Raichur Fort won by Sri Krishnadevaraya, Image Credits: Madhu B M

रायचूरची लढाई महत्वाची मानली जाते. इसवी सन १५ मे १५२० रोजी झालेल्या या लढाईमध्ये सुमारे १६००० विजयनगरचे सैनिक मारले गेले. नंतर, पेमास्सान रामलिंग नायडू यांच्या नेतृत्वाखाली विजयनगरच्या सैनिकांनी रायचूरचा किल्ला जिंकला.

त्यानंतर, पेमास्सान रामलिंग नायडू याची प्रसंशा केली. या युद्धामध्ये भयानक रक्तपात झाला होता. विजयनगरच्या बाजूने या लढाईमध्ये जवळपास ८००००० पायदळ, ३५००० घोडदळ आणि ६०० हत्ती वापरले होते.

विदेशी संबंध

सम्राट कृष्णदेवरायांनी पोर्तुगीजांशी खूप चांगली संबंध प्रस्थापित केले. सम्राटांनी इसवी सन १५१० मध्ये पोर्तुगीज डोमिनियन ऑफ इंडिया ची गोव्यामध्ये स्थापना केली. त्यामुळे विदेशी व्यापाराला चालना मिळाली.

सम्राट कृष्णदेवरायांनी त्यांच्या अश्वशाळेतही पोर्तुगीज घोडे आणि सुरक्षा व्यवस्तेत पोर्तुगीज बंदुकीचा समावेश केला. कृष्णदेवरायांनी पोर्तुगीजांच्या सुधारित पाणीपुरवठा यंत्रणेचाही विजयनगरमध्ये पोर्तुगीज तज्ज्ञांच्या मदतीने अवलंब केला.

या युद्धानंतर बहामनी सल्तनतची पूर्वीची राजधानी असलेल्या गुलबर्गा या किल्ल्याला वेढा देऊन तो किल्ल्या जिंकला. या मोहिमेनंतर सम्राट श्री कृष्णदेवराय यांचे संपूर्ण दक्षिण भारतावर अधिपत्य झाले होते.

तिरुमाला राय या युवराजचा मृत्यू

इसवी सन १५२४ मध्ये सम्राट कृष्णदेवरायांनी त्यांचा मुलगा तिरुमला राय याला विजयनगरचा युवराज घोषित केले. परंतु, युवराजला विषबाधा होते, त्यातच त्याचा मृत्यू होतो. या षडयंत्रात सर्वात विश्वासू सल्लागार आणि पितातुल्य असणारे तिम्मारुसु आणि त्यांचा मुलगा यांचा समावेश असावा, असा संशय कृष्णदेवरायांना होता. त्यामुळे, ते त्यांना आंधळे करण्याचा दंड देतात.

श्री कृष्णदेवराय यांचा मृत्यू

त्यानंतर, बेलगामच्या किल्ल्यावर आक्रमणाच्या तयारीत असताना, कृष्णदेवराय गंभीर आजारी पडले. त्यांनी त्यांचे भाऊ अच्युत देवा राय यांना आपला उत्तराधिकारी घोषित केले. त्यानंतर, सन १५२९ नंतर काही दिवसांतच त्यांचा मृत्यू झाला.

साहित्याचे सुवर्णयुग

सम्राट श्री कृष्णदेवरायांच्या काळाला साहित्याचे सुवर्णयुग म्हटले आहे. कारण, याच काळात विविध भाषांमध्ये मोठ्या प्रमाणावर साहित्यनिर्मिती झाली. वेगवेगळ्या तामिळ, कन्नड, संस्कृत, तेलगू इत्यादी भाषेतील कवींना सम्राटांनी आश्रय दिला होता.

श्री कृष्णदेवराय यांच्या राजवंशाबद्दलचे विवाद

काही इतिहासकार कृष्णदेवरायांना तुलूवा राजवंशाचे, काही कन्नडिगा, तर काही तेलगू राजवंशाचे मानतात. त्यांचा राजवंश कोणता हा एक विवादास्पद प्रश्न आहे. परंतु, ते तुलूवा राजवंशाचे होते यावर बहुसंख्य इतिहासकार एकमत आहेत.

विजयनगर साम्राज्यातील कृष्णदेवरायद्वारा नियुक्त- अष्टदिग्गज

श्री कृष्णदेवरायांच्या दरबारातील तेलगू साहित्याचा आधारस्तंभ असलेल्या आठ कवींना “अष्टदिग्गज” असे म्हटले आहे. विजयनगर के दरबार के अतिरिक्त यह आठ दिग्गज विजयनगर ला सुचारु पद्धतीने चलावण्यास जबाबदार होते. या अष्टदिग्गजांमुळे विजयनगरचे ऐतिहासिक तेलुगु साहित्याला शिखरावर पोचवले.

ईसवी सन १५४० ते १६०० या काळाला प्रबंध काल असे म्हटले गेले. सम्राट कृष्णदेवरायांच्या दरबारात होणाऱ्या “कवी साहित्य सभेतील” या दिग्गजांना आठ स्तंभ मानले जाते. यामधील आठव्या दिग्गाजाची अष्टपदी नियुक्ती नंतरच्या काळात म्हणजेच सतराव्या शतकात झाल्याची समजले जाते.

अ. नं.अष्टदिग्गजाचे नावमाहिती
अल्लासनी पेड्डाणाअष्टदिग्गजांमध्ये अल्लासनी पेड्डाणा यांचे नाव सर्वप्रथम येते.

गाव: सोमंडपल्ली, अनंतपूर नंतर पेड्डाणापासू, येर्रागुंतला, काडपा जिल्हा येथे स्तलांतरित

विशेषता:

असे मानले जाते की, सर्व कवींमध्ये पेड्डाणा यांचे सर्वांत वरिष्ठ स्थान होते. काहींच्या मते कृष्णदेवरायांनी स्वतः त्यांच्या सन्मानार्थ त्यांची पालखी उचलली होती.

श्री कृष्णदेवराय यांनी “कनकभिषेकम्” या शीर्षकाने पेड्डाणा यांना सन्मानित केले होते.
राजघराण्यातील शाही हत्तीवर बसण्याचा मान मिळवणारे एकमेव कवी.

श्री कृष्णदेवरायांच्या मृत्यूवेळी पेड्डाणा यांनी “अटी कृष्णा रायाला थोटी डीव्हीकेंगलेका ब्राठिकी उन्दिठी जीवातचवाम्बू नागूचु” या कवितेने त्यांचे दुःख व्यक्त केले.
नंदी थिम्मानाजन्म: यांचा जन्म सिंगन्ना आणि थिम्मामाम्बा यांच्या घरी झाला.

गाव: हेदेखील अनंतपुरचे निवासी असल्याचे समजले जाते.

त्यांच्या जीवनातील महत्वाच्या घडामोडी:

नंदी थिम्माना हे विजयनगर साम्राज्याच्या एका राज्याचे प्रमुख असल्याचे मानले जाते. ज्यांची कन्या राजकुमारी तिरुमला देवी या होत्या.

पारिजातपहरनामु नवाने पूर्ण केलेले त्यांचे काम त्यांनी आपले राजा म्हणजेच श्री कृष्णदेवराय यांना समर्पित केले होते.

ते आचार्य अघोरा शिवा यांचे शिष्य होते. ते शैव संप्रदायातील असूनही त्याचे काम वैष्णव संप्रदायावरही आधारित होते.

त्यांनी केलेली तेलुगु भाषेतील सुंदर नकावरील कविता त्यावेळी प्रसिद्ध झाली होती. तेलगू भाषेमध्ये नाकाला मुक्कू असे म्हणतात. यामुळे त्यांना “मुक्कू थिम्मना” या नावानेदेखील ओळखले जात.

कन्नड साहित्यातील प्रसिद्ध कवी कुमारव्यास यांचे अपूर्ण महाभारत नंदी थिम्माना यांनी पूर्ण केले. त्याचप्रमाणे, “कर्नाटक कृष्णदेवराय भरथा कथामंजरी” या नावाने दरबारामध्ये प्रसिद्ध केले.
तेनाली रामकृष्णगाव: विकटकवि (विदूषक) या रूपामध्ये ओळखले जाणारे तेनाली रामकृष्णा प्रसिद्ध तेलगू कवी होते. तेजस्वी बुद्धीचे धनी असलेल्या या दिग्गजाने त्यांच्या विनोदी स्वभावाने दरबारात महत्वाचे स्थान मिळवले. सम्राट कृष्णदेवरायांच्या कारकिर्दीत यांनी दरबारात महत्वाची भूमिका निभावली होती.
मदय्यागरी मल्लना
धुर्जाति
आयलाराजू रामभद्रुडू
पिंगळी सुराणा
रामराजभूषणु

Image Credits: Chavakiran

Subscribe Now For Future Updates!

Join and recieve all future updates for FREE!

Congrats!! Now you are part of HN family!

Pin It on Pinterest